|
सन १९८९ पासून या जिल्हा परिषदेअंतर्गत ल.पा. दक्षिण व उत्तर असे दोन स्वतंत्र विभाग कार्यान्वित झाले. सन १९९९ पासून ल.पा. (दक्षिण) विभाग हा ग्रामिण पाणी पुरवठा व ल.पा. (उत्तर) विभाग हा लघु पाटबंधारे विभाग म्हणून कार्यान्वित झाला. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ कलम १०० नुसार १०० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या लघु योजना जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येतात. |
|
जिल्हा परिषदे मार्फत होणारी लघु पाटबंधारेची कामे लहान लहान स्वरुपाची असल्याने त्यासाठी तुलनेने निधी देखील कमी लागतो. व सदर कामे लवकर पुर्ण होतात. जनतेला ताबडतोब सिंचनाचा लाभ मिळायला लागतो. ज्या ठिकाणी मोठे प्रकल्प घेण्यास मर्यादा येतात अशा ठिकाणी जिल्हा परिषदे मार्फत छोटया छोटया योजना राबवून लाभ दिला जातो. |
|
भूपृष्ठावरील वाहुन जाणारे पाणी अडवुन भूगर्भातील व भूपृष्ठावरील पाणी साठ्यात वाढ करता येते. व या पाणी साठयापासुन अप्रत्यक्ष पणे व प्रत्यक्षपणे जलसिंचन क्षेत्रात वाढ होते. शेतीचे उत्पादन वाढून राष्ट्रीय विकास होण्यास मदत होते. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागा मार्फत प्रामुख्याने सामुहिक लाभाच्या योजना तसेच सिंचन विहिरी सारखी वैयक्तीक लाभाची योजना राबविली जाते. या योजनांसाठी राज्य शासन व केंद्र शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो. |