जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इ. १ ली ते ८ वी च्या मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथ.) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात. इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा पुढील योजना राबविल्या जातात. |
केंद्रशासन पुरस्कृत योजना | |
---|---|
१. शाळाखोल्या बांधकाम व शाळा देखभाल दुरूस्ती २. शाळाबाह्य मुले (पर्यायी शिक्षण) ३. मोफत पाठ्यपुस्तके ४. मोफत गणवेश योजना- इ. १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेश संच ५. मा. पीएम श्री शाळा अनुदान ६. गटसाधन व समुहसाधन केंद्र अनुदान ७. शाळा अनुदान ८. शिक्षक प्रशिक्षण ९. राष्ट्रीय आविष्कार योजना १०. लोकप्रतिनिधी प्रशिक्षण ११. समावेशित शिक्षण १२. उपचारात्मक अध्यापन १३. शाळाखोली मोठी दुरूस्ती १४. प्रधानशक्ती पोषण निर्माण योजनेंतर्गत इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविणे. |
राज्यशासन पुरस्कृत योजना | |
---|---|
१. मुख्यमत्री माझी सुंदर शाळा. २. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविणे. ३. इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे पुरविणे. ४. ग्रामीण भागात आदर्श शाळा पुरस्कार ५. इ ५ वी ते ८ वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेस बसणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची फॉर्म फी व शाळा संलग्नता फी भरणे. |