|
कार्यकारी अभियंता हे या विभागाचे प्रमुख आहेत. या विभागाला केंद्रशासन, राज्यशासन व जिल्हा परिषद यांचेकडून विविध योजने अंतर्गत अनुदान प्राप्त होते. सदर अनुदानातून ग्रामिण स्तरावर रस्ते, पुल व मोऱ्या, आरोग्य, पशू संवर्धन व इतर योजनेंतर्गत ईमारत बांधकाम व दुरूस्तीची कामे केली जातात. तसेच जिल्हा परिषदेच्या ईमारतींची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारीही या विभागाकडे आहे. |
|
तांत्रिक कामकाज उदा. सर्वेक्षण करणे, अंदाजपत्रके, आराखडे तयार करणे आणि नियोजन व विविध योजनांची यांचे मार्फत केली जाते. केलेल्या देखभाल - अंमलबजावणी कामाच्या मोजमाप नोंदी ठेवण्यात येतात. |
|
जिल्हा परिषदेचे मा. पदाधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक इ. कडून आलेल्या कामांच्या तांत्रिक प्रस्तावांची छाननी करून सक्षम प्राधिकरणांकडून मंजूरी घेऊन उपलब्ध अनुदानानुसार सदर प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाते. ही कामे कार्यकारी अभियंता,उप अभियंता, शाखा अभियंता यांचे पर्यवेक्षणाखाली पुर्ण केली जातात. |