पशुसंवर्धन विभाग हा पुर्वी जिल्हा लोकल बोर्ड, अहिल्यानगरकडे कार्यान्वीत होता. त्यावेळी अहिल्यानगरमध्ये एकूण ११ दवाखाने कार्यरत होते. दि. १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर हे ११ दवाखाने जिल्हा परिषद अहमदनरकडे हस्तांतरीत झाले व नंतर अन्य दवाखान्यांची स्थापना झाली. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पशुसंवर्धन विभाग १९९२ पर्यंत मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे अखत्यारीतील शेती, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती अंतर्गत कार्यरत होता. | |
पशुसंवर्धन विभागाची महत्वाची कार्ये व उद्दिष्ट्ये:- १. गोपालकांना पशुवैद्यकीय सेवा पुरविणे. २. संकरीत गोपैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. ३. रोग प्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे. ४. कुक्कुट विकास, शेळी-मेंढी विकास करणे. ५. वैरण विकास कार्यक्रम राबविणे. ६. पशुपालनातून स्वयंरोजगार निर्मिती करणे. ७. जिल्हा परिषद, राज्य शासन व केंद्रशासनाच्या विविध योजना राबविणे. ८. पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे. ९. प्रचार व प्रसार योजना राबविणे. |