सर्व शिक्षा अभियानाचे मूळ स्वरुप - शालेय व्यवस्थापामध्ये समाजाच्या सक्रिय सहभागाद्वारे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान हा एक प्रयत्नआहे. दर्जेदार शिक्षणाच्या संपूर्ण देशभरातून होणाऱ्या मागणीस हा एक प्रतिसाद आहे. सर्व शिक्षा अभियान हा एक असा कार्यक्रम आहे की, ज्यामध्ये सर्व मुलांमधील भावी क्षमतांचा विकास समाज/वस्तीच्या सहाय्याने, दर्जेदार शिक्षणाची संधी देऊन करता येईल. |
|
सर्व शिक्षा अभियान म्हणजे काय ? प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम. दर्जेदार प्राथमिक शिक्षणाच्या संपूर्ण देशभरातील मागणीस प्रतिसाद. प्राथमिक शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय वृद्धिंगत करण्यासाठी संधी. पंचायत राज संस्था, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामीण व शहरी भागातील झोपडपट्टी पातळीवरील शिक्षण समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक शिक्षक संघ, आदिवासी स्वायत्त संस्था आणि वस्तीपातळीवरील संस्थांना प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापनात प्रभावीपणे सहभागी करुन घेण्याचा एक प्रयत्न. देशभर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची अभिव्यक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्र सरकार यांची भागीदारी... राज्यांना त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षणाचा विकास करण्यास संधी. |
|
सर्व शिक्षा अभियाची ध्येये - सर्व शिक्षा अभियानाद्वारे सन २०१० पर्यंत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविणे. समाजाच्या वस्तीच्या किंवा स्थानिक लोकांच्या शालेय व्यवस्थापनातील सक्रिय सहभागाद्वारे समाजिक, प्रादेशिक आणि जेंडरविषयक भेदभाव कमी करणे. |
|
सर्व शिक्षा अभियाची उद्दिष्टे - इ.स. २००३ पूर्वी सर्व मुले शाळेत, शिक्षण हमी केंद्रात, पर्यायी शाळेत अथवा शाळेत परत आणणाऱ्या व्यवस्थेत दाखल करणे. इ.स. २००७ पूर्वी सर्व मुलांना ५ वर्षाचे प्राथमिक शालेय शिक्षण. इ.स. २०१० पूर्वी सर्व मुलांना ८ वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण. समाधानकारक दर्जेदार प्राथमिक शिक्षणावर तसेच जीवनासाठीच्या शिक्षणावर भर. इ.स. २००७ पूर्वी प्राथमिक शिक्षणातील सर्व स्तरावरील उणीवा दूर करुन सामाजिक तसेच लिंगभेद दूर करण्यात येतील. लिंगभेद व समाजाच्या विविध घटकातील दरी २००७ पर्यंत भरुन काढणे आणि इ.स. २०१० पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वांची समान पातळी निर्माण करणे. इ.स. २०१० पर्यंत सर्व मुलामुलींना शाळेत टिकवून ठेवणे. |