जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कृषि विभागाची निर्मिती सन १९६२ मध्ये करण्यात आली. कृषि विकास अधिकारी हे वर्ग १ चे पद दिनांक १/११/१९६३ पासून कार्यरत आहे. | |
कृषि विभाग जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. १. नवीन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ३. जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत व विविध योजनांची अंमलबजावणी करणे. ३ (अ) अनुदानतत्त्वावर कडबाकुट्टी वाटप.. ३ (ब) अनुदानतत्त्वावर शेतक-यांना स्लरी फिलटर वाटप ४. जिल्ह्यातील शेतक-यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा वेळेत पुरवठा होणेकामी नियोजन व संनियंत्रण करणे सदर कामासाठी जिल्हा व तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षका मार्फत निविष्टा नमुने काढणे तपासणी करणे. |
जिल्हयाची सर्वसाधारण माहिती | |
---|---|
जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र हेक्टर | १७,०२,०३९ |
लागवडी लायक एकूण क्षेत्र हेक्टर | १३,५९,९०० |
एकूण खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र हेक्टर | ४,६०,४०० |
एकूण रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र हेक्टर | ७,५८,३०० |
एकूण खरीप गावे संख्या | ५८० |
एकूण रब्बी गावे संख्या | १,००७ |
जिल्हयातील सन २००५-२००६ मध्ये ५० पैसे पैक्षा कमी आणेवारी असलेली गावं खरीप रब्बी |
४५८ ७९ |
सरासरी पर्जन्यमान जून ते ऑक्टोबर मी.मी. प्रत्यक्ष पर्जन्यमान जून ते ऑक्टोबर मी.मी. सरासरीचे तुलनेत पडलेला पाऊस |
४९५.९ ७४३.६ १४९.९६ टक्के |
बागायत क्षेत्र अ. पाटपाण्याखालील ब. बागायत क्षेत्र एकूण बागायत क्षेत्र |
०.६५ लाख हेक्टर २.०६ लाख हेक्टर २.७१ लाख हेक्टर (२८.५ टक्के) |
जमिनीचा प्रकार अ. हलक्या प्रकारची जमिन ब. मध्यम प्रकारची जमिन क. भारी काळी जमिन ड. तांबडया प्रकारची जमिन |
२४ टक्के ३८ टक्के ३६ टक्के २ टक्के. |