रचना व कार्यपध्दती |
---|
सामान्य प्रशासन विभाग १, जिल्हा परिषद अंतर्गत आस्थापना विषयक कामकाज, कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी, अनुकंपा विषयक, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे कामकाज, मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे अधिनस्त स्थायी समिती सभा, वार्षिक प्रशासन अहवाल, खाते प्रमुख व पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुख यांच्या बैठका, कर्मचारी प्रशिक्षण, जिल्हा परिषदेच्या सर्व खात्यांकडून प्राप्त होणाऱ्या संचिकांवर अभिप्राय व योग्य त्या प्रशासकीय कार्यवाही बाबतचे विवेचन, जनतेकडुन प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत त्या त्या विभागाकडे पाठविणे व त्यावर संनियंत्रण करणे व संपूर्ण जिल्हा परिषदेचा आस्थापना विषयक कार्यभार पहाण्यात येतो. |
१. आस्थापना विभाग - आस्थापना विभागामार्फत वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण आस्थापना विषयक कामकाज, सेवा विषयक बाबी, वेतन व भत्त्यांबाबत अनुदान उपलब्द करुन देणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, वाहनचालक व वाहनांबाबत प्रशासकीय व अग्रीम मंजुरी, अनुकंपा मधील प्राप्त उमेदवारांना नियुक्ती तथा प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करणे, जाहिरात देऊन पद भरती करणे, पदोन्नती, वेतनवाढी प्रदान करणे, पदस्थापना, बडतर्फी, निलंबन, गोपनीय अभिलेखे, चौकशी प्रकरणे, वर्ग १ ते वर्ग ४ अधिकारी व कर्मचारीऱ्यांची वैद्यकीय देयके मंजुरी इ. त्याच प्रमाणे खाते प्रमुखांकडुन प्राप्त होणाऱ्यासंचिकांवर अभिप्राय व योग्य ती प्रशासकीय कार्यवाही व मार्गदर्शनपर अभिप्राय देणे, इ. बाबत संनियंत्रण करण्यात येते. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वर्गाद्वारे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. |
२. रचना व कार्यपध्दती - सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत सर्व खाते प्रमुख व पंचायत समिती स्तरावरील कार्यालये यांचेवर नियंत्रण, त्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, तसेच प्रशासकीय बाबी सर्व कार्यालयांना अवगत करणे, मा. मंत्री महोदय, मा. सचिव, मा. विभागीय आयुक्त यांचे बैठकांबाबतची माहिती संकलीत करणे, आचारसंहिता कालावधीत काय कार्यवाही करावी या बाबत संपूर्ण माहिती उपलब्द करुन देणे, त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान, विभागीय स्तरावरील बैठकांची माहिती संकलीत करणे इ बाबींचे संनियंत्रण करण्यात येते. |
३. परिषद विभाग - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे कामकाज पहाणे, सदर सभेच्या इतिवृत्तांवर योग्य ती कार्यवाही करणे, तसेच सदर इतिवृत्त मंजुरीनंतर जनतेस पहाण्यास उपलब्द करुन देणे, तसेच जिल्हा परिषदेच्या समिती सभांच्या कामकाजाबाबत प्रशासकीय नियंत्रण ठेवणे, लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचे मा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडून संकलन करुन त्याबाबत सर्व खाते प्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीस प्रसिध्दी देणे. जिल्हा परिषदेच्या विरुध्द जनतेने अथवा अन्य प्राधिकरणांनी दाखल केलेल्या न्यायालयीन केसेस बाबत जिल्हा परिषदेच्या वतीने मा. न्यायालयात जिल्हा परिषदेची बाजू मांडणे कामी वकीलांच्या नियुक्ती बाबतचे कामकाज करण्यात येते. |
४. प्रशासन विभाग - जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे त्यास संबंधीत समितींची मंजूरी घेणे, जिल्हा परिषद सर्व साधारण सभेची मंजूरी घेऊन मा. शासन ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना सादर करणे, कर्मचाऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अपिलांवर निर्णय घेणे, पंचायत राज समितीचे संपूर्ण कामकाज पहाणे, पंचायत राज समिती, स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन करणे, जिल्हा परिषदेची वार्षिक दैनंदिनी तयार करणे इ. कामकाज करण्यात येते. |
५. जनतेच्या तक्रारींबाबत - जनतेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यालयीन कामकाजाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत चौकशी करणे, जनतेस आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करुन देणे, खाते प्रमुख व पंचायत समिती स्तरावरील प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी करुन त्या बाबत योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करणे. |
६. प्राप्त पत्रांवरील कार्यवाही बाबत - जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाबाबत प्राप्त होणारी जनतेची पत्रे, मा. मंत्रालयीन स्तरावरील पत्रव्यवहार, मा. आयुक्त, कोर्ट विषयक पत्र व्यवहार, मा लोक आयुक्त पत्रव्यवहार, मा. आमदार, मा. खासदार, मा. मंत्री, मा. पदाधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर तसेच पंचायत समिती व मुख्यालयातील खाते प्रमुख यांचे कडून प्राप्त होणारा पत्रव्यवहार सामान्य प्रशासन विभाग १, येथे संकलीत करुन त्या बाबतचे संबंधीत खात्यांना करावयाचे वाटप तसेच मा. मंत्रालयीन स्तरावरील पत्रव्यवहार, मा. आयुक्त स्तरावरील पत्रव्यवहार, कोर्ट विषयक पत्र व्यवहार, मा लोक आयुक्त पत्रव्यवहार, मा. आमदार, मा. खासदार, मा. मंत्री, मा. पदाधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर तसेच पंचायत समिती व मुख्यालयातील खाते प्रमुख यांना पाठविण्याचे पत्राबाबत कार्यवाही करण्यात येते. |
७. इतर विषय - माहिती अधिकार अधिनियम २००५ व ग्रामस्थ दिन योजना यांचे कामकाज पहाणे, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अर्जांबाबत संबंधीत विभाग यांना पाठविणे व त्यावरील कार्यवाहीचा अहवाल मागविणे, ग्रामस्थ दिन योजने बाबत प्राप्त तक्रारी संबंधीत खाते प्रमुख तसेच पंचायत समिती यांचे कडून पुर्तता करुन घेणे, मासिक अहवाल प्राप्त करुन घेऊन शासनास व मा विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर करणे. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम ४ नुसार स्वयंप्रेरणेने प्रसिध्द करावयाच्या बाबींचे प्रगटीकरण व प्रसिध्द करणे. |
संपर्क अधिकारी - १. मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) , जिल्हा परिषद अहमदगर २. कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग १ , जिल्हा परिषद अहिल्यानगर ३. कार्यालयीन अधिक्षक, सामान्य प्रशासन विभाग १ , जिल्हा परिषद अहिल्यानगर संपर्काकरीता - दुरध्वनी क्रमांक - ०२४१ - २३५३६९५ फॅक्स क्रमांक - ०२४१ - २३२२४२९ |