केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी धारणी (अमरावती) व धारावी (मुंबई) या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बाल मृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिने सुरु करण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एकुण २१ आहेत, त्यापैकी २ आदिवासी व १९ ग्रामीण प्रकल्प आहेत, ५३७५ अंगणवाडी केंद्र कार्यान्वित आहेत..
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना खालील सेवा पुरविण्यात येत आहेत.
पूरक पोषण आहार
लसीकरण
आरोग्य तपासणी
संदर्भ सेवा
अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण
आरोग्य व आहार शिक्षण
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा उद्देश -
० ते ६ वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
मुलांचा योग्य शारिरीक, मानसिक, व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
बालमृत्यू, कुपोषण व शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे.
बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागांमध्ये धोरण व अंमलबजावणी या बाबत परिणामकारक समन्वय साधणे.
योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्या बाबत मातांची क्षमता वाढविणे.