अहिल्यानगर जिल्हा संपुर्ण महाराष्ट्रात आकाराने मोठा जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्हयास एैतिहासिक, भौगोलिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. अहिल्यानगर जिल्हयाचा विस्तार १८.२ ते १९.९ उत्तर अक्षांश व ७३.९ ते ७५.५ पूर्व रेखांश असा आहे. अहिल्यानगर जिल्हयाच्या उत्तरेला नाशिक व छ. संभाजीनगर जिल्हा, दक्षिणेला धाराशिव व सोलापुर जिल्हा, पश्चिमेला ठाणे व पुणे जिल्हा पुर्वेला बीड जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्हायात १४ तालुके असुन त्यामध्ये एकुण १५८६ गांवे आहेत तर १३१६ ग्रामपंचायती आहेत. अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा असुन या जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ १७.४१ लाख हेक्टर कि.मी. इतके आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्हयाची लोकसंख्या ४५,४३,१५९ आहे. जिल्हयात एकुण ५५०५ अंगणवाडया आणि ५८७ मिनी अंगणवाडया आहेत. तर २१ साखर कारखाने आहेत. अहिल्यानगर जिल्हयात १ महानगरपालिका, १० नगरपरिषद, ५ नगरपंचायत, १ कटकमंडळ आहेत, तर ११३ प्राथमिक आरोग्य केंद्र (पैकी १०० कार्यान्वित ), २२ ग्रामिण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये , १ सामान्य रुग्णालय ,५ प्राथमिक आरोग्य पथके, २ आर्युवेदिक दवाखाने, ५९८ आरोग्य उपकेंद्र ( पैकी ५५५ कार्यान्वित ) व २४ तास ७ दिवस प्रा. आ. कें. ५२, इ. मार्फत ग्रामिण व शहरी जनतेस आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. आरोग्य विभागाच्या विविध योजना राज्यात राबविण्यात अग्रेसर असणारा जिल्हा म्हणुन अहिल्यानगर जिल्ह्याने सार्वजनिक आरोग्य विभागात ठसा उमठविला आहे. . आरोग्य विभागामार्फत खालील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यांत येते. राष्ट्रीय आरोग्य अभियान. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम. राष्ट्रीय माताबाल संगोपन कार्यक्रम. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय कुष्टरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम. वरील कार्यक्रमा व्यतीरिक्त खालील आरोग्य कार्यक्रमाचीही कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली जाते. महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्पाअंतर्गत साथरोग सर्वेक्षण कार्यक्रम पाणी शुदधीकरण व साथ नियंत्रण कार्यक्रम. महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्पा अंतर्गत मृत्यूचे कारण सर्वेक्षण (ग्रामिण) योजना व नागरी नोंदणी पदधतीची अंमलबजावणी. जंत विरोधी मोहिम व जिवनसत्व अ वाटप. आरोग्य शिक्षण व माहिती प्रसारण कार्यक्रम. नवसंजीवनी योजना आदीवासी भागासाठी. पल्स पोलिओ लसिकरण मोहीम. आरोग्य विभागातील कर्मचा-यांचे प्रशिक्षण. मातृत्व अनुदान योजना. |