|
अहिल्यानगर जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभागा मार्फत ग्रामिण नळ पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी, नवीन विंधन विहीरी घेणे, साध्या विहीरीची बांधकामे, उच्च क्षमतेच्या विंधन विहीरीवर विद्युत पंप बसविणे, प्रादेशिक योजनांची देखभाल व दुरूस्ती, पिण्याचे पाण्याचे टंचाई कालावधीत विविध उपाययोजना राबविणे, स्थानिक विकास कार्यक्रमातर्गत आमदार निधी व खासदार निधीतील योजनांची अंमलबजावणी, स्वजल धारा योजनेची अंमलबजावणी, शिवकालीन पाणी साठवण योजनेची अंमलबजावणी ग्रामिण भागातील शाळांना पाणी पुरवठा करणे, भारत निर्माण योजना या माध्यमातुन ग्रामिण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविला जातो. तसेच लोकसहभागातील योजनांसाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांना संपूर्ण सहाय्य, मार्गदर्शन केले जाते व संनियंत्रण केले जाते. |