Chief Minister Prosperous Panchayat Raj Campaign (2025-26)
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
जिल्हा परिषद, अहिल्यानगर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६)
(ग्रामविकास विभाग- शासन निर्णय- दिनांक ६ ऑगस्ट २०२५)
पार्श्वभूमी:-राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानाचा हेतू-
- कार्यक्रमाचेनाव: – मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान (सन२०२५-२६)
- विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
- योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
- लोकांचे जीवनमान उंचावणे
- नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
- आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे
अभियानाचा कालावधी– दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५
अभियानाचे प्रमुख ७ घटक-
१.सुशासनयुक्तपंचायत (लोकाभिमुखप्रशासन)- समाविष्ट महत्वाचे घटक :
- नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणे.
- नागरीकांच्या सर्व तक्रारी निकाली काढणे.
- ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यावर सर्व माहिती प्रसिध्द करणे.
- गावात सीसीटीव्ही बसविणे.
- गावातील पात्र लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्ड उपलब्ध करुन देणे.
- गावातील पात्र दिव्यांगांना ओळखपत्र मिळवून देणे.
२.सक्षमपंचायत (स्वनिधी, CSR, लोकवर्गणी)- समाविष्ट महत्वाचे घटक:
- ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वसूल करणे.
- हजार लोकसंख्येमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्यामधून लोकोपयोगी कामे करणे.
- ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेणे.
३.जलसमृद्ध, स्वच्छवहरितगाव – समाविष्ट महत्वाचे घटक:
- गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुध्द पाणी पुरवठा करणे.
- सौर उर्जेचा वापर करुन वीज देयके शून्यावर आणणे.
- पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे.
- अपारंपारीक उर्जेचा वापर वाढविणे.
- वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे.
- गावातील घनकच-याचे व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
- बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करणे.
४.मनरेगावइतरयोजनांचेअभिसरण– समाविष्ट महत्वाचे घटक:
- रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.
- या योजनेतून माती व जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, बायोगॅस, शेळीपालन शेड,कांदाचाळ इ. कामे हाती घेणे.
- घरकुल बांधकामात या योजनेतून रु. २८,०००/- चे योगदान घेणे.
५.गावपातळीवरीलसंस्थासक्षमीकरण – समाविष्ट महत्वाचे घटक:
- ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन घेणे.
- गावांतील शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे.
- गावांत जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करणे.
- गावातील स्मशानभूमी विकास करणे.
- गावात क्रीडांगण व व्यायामशाळा उपलब्ध करुन देणे.
६.उपजीविकाविकासवसामाजिकन्याय– समाविष्ट महत्वाचे घटक:
- मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करुन घेणे.
- गावातील बचत गटांचा विकासात सक्रीय सहभाग घेणे.
- बचत गटांतील जास्तीत जास्त महिलांना लखपती दिदी करणे.
- गावातील युवकांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देणे.
- गावात शेती गट स्थापन करुन त्यांची उत्पादकता वाढविणे.
७.– लोकसहभागवश्रमदानातूनलोकचळवळ– समाविष्ट महत्वाचे घटक:
- लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करणे.
- आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे.
- गावातील रस्ते दुरुस्त करुन दळणवळणाला चालना देणे.
अभियानाची पूर्वतयारी-
राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय कार्यशाळांच्या माध्यमातून नागरिकांना व अधिकारी कर्मचारी यांना अभियानाचे प्रशिक्षण देणे.
१. राज्यस्तरीय कार्यशाळा दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी मा. ग्रामविकास मंत्री यांचे उपस्थितीत पार पडली. या कार्यशाळेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मनरेगा, प्रकल्प संचालक- पाणी व स्वच्छता, निवडक सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
२. जिल्हास्तरीय कार्यशाळा- दि. ०५ सप्टेंबर २०२५– आज संपन्न होत असून या कार्यशाळेसाठी सन्मा. लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा व तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी अशा साधारण २००० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आयोजनाची जबाबदारी- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची आहे.
३. तालुका/ पंचायतस्तरीय कार्यशाळा– या कार्यशाळा दि. ६ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधी दरम्यान तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेसाठी तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, संगणक परिचालक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आयोजनाची जबाबदारी- गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांची असेल.
४. ग्रामस्तरीय कार्यशाळा– या कार्यशाळा दि. ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधी दरम्यान ग्रामस्तरावर आयोजित येणार आहेत. या कार्यशाळेसाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आयोजनाची जबाबदारी- सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांची असेल.
५. विशेष ग्रामसभांचे आयोजन- दि. १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत चर्चा करण्यात येऊन ग्रामपंचायत अभियानात सहभागी होत असल्याबाबतचा ठराव करून गावातील नागरिकांचे अभियानातील घटकनिहाय लहान-लहान गट स्थापन करण्यात येतील. हे गट आपल्या गावाला/ग्रामपंचायतीला अभियानात यशस्वी करण्यासाठी काम करतील. नोडल अधिकारी ग्रामसभांना उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
मूल्यमापनप्रक्रिया:
– ग्रामपंचायतीनेस्वयंमूल्याकन-पंचायतसमितीकडेसादर (दि. १०जानेवारी२०२६)
– तालुकास्तरीयसमिती- (दि. ११ जानेवारी-२६जानेवारी२०२६)
– जिल्हास्तरीयसमिती- (दि. २८जानेवारी-१५फेब्रुवारी२०२६)
– विभागीयसमिती- (दि. १७फेब्रुवारी-२७फेब्रुवारी२०२६)
– राज्यस्तरीयसमिती- (मार्च२०२६)
– पुरस्कारवितरण- (मे२०२६)
पारितोषिके:
स्तर | प्रथम | द्वितीय | तृतीय |
तालुकास्तर | १५ लक्ष | १२ लक्ष | ८ लक्ष |
जिल्हास्तर | ५० लक्ष | ३० लक्ष | २० लक्ष |
विभागीय स्तर | १ कोटी | ८० लक्ष | ६० लक्ष |
राज्यस्तर | ५ कोटी | ३ कोटी | २ कोटी |
पत्रकारांना पुरस्कार-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत जनजागृती/अभियानामध्ये लोकसहभाग वाढवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येईल.
*******
अधिक तपशिलासाठी पुढील शासन निर्णय वाचा –
Beneficiary:
• Ensuring the benefits of schemes reach the last segments of the village.
Benefits:
• Elevating the standard of living of people• Providing services to citizens in an easy manner Working in health, education, livelihood, and social justice