मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
उद्दिष्टः– उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.
आर्थिक तरतूदः– यासाठी रू. 5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अंमलबजावणी संस्थाः– कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, मराहाष्ट्र राज्य
योजनेची ठळक वैशिष्ट्येः– https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेले विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प / उद्योग / स्टार्टअप / विविध प्रकारच्या आस्थापना यांनी नोंदणी करायची आहे. विविध क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या संधीनुसार विद्यार्थ्यांना संबंधित ठिकाणी 6 महिने कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण (इंटर्नशीप) घेता येणार आहे. त्यासाठी राज्यशासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना विद्यावेतन देणार आहे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या पोर्टलला भेट द्यावी.
लाभार्थी:
प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.
लाभ:
उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.यासाठी रू. 5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा
वरील नमूद प्रमाणे