उद्दिष्टे आणि कार्ये
उद्दिष्टे
अहिल्यानगर ग्रामीण क्षेत्रामध्ये मुलभुत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर, व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवविणे, विविध बचत गट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपक्रम चालविणे, विविध घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास या कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरण याद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
कार्ये
- एकात्मिक व शाश्वत ग्रामीण विकास धोरण 2023-28 ची अंमलबजावणी करणे.
- ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध पायाभुत सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणे.
- शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामधील मुलभुत सेवा सर्वांना सहजरित्या उपलब्ध करून देणे.
- जिल्ह्यांतर्गत महिला, शेतकरी, पशुपालक, वृद्ध कलावंत इत्यादी घटकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन, अनुदाने आणि कामकाजावर देखरेख ठेवणे.
- केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- पंचायत राज व्यवस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- ग्रामविकास विभागाद्वारे घेण्यात आलेल्या पुढाकारांची विविध माध्यमांद्वारे सक्रियपणे माहिती प्रदान करणे.
- वेळोवेळी निश्चित गेलेल्या ग्रामविकास विभागाकडील प्रमुख (फ्लॅगशिप) कार्यक्रमांची तत्परतेने अंमलबजावणी करणे.
- ग्राम विकास विभागातील महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी परिषदा, कार्यशाळा, ऑनलाईन परिसंवाद आणि प्रदर्शनांना प्रोत्साहन देणे.