आरोग्य
अहिल्यानगरजिल्हासंपुर्णमहाराष्ट्रात आकाराने मोठा जिल्हा आहे. अहिल्यानगरजिल्हयात १ महानगरपालिका, १० नगरपरिषद, ५ नगरपंचायत, १ कटकमंडळ आहेत, तर ११३ प्राथमिक आरोग्य केंद्र (पैकी १०० कार्यान्वित ), २२ ग्रामिणरुग्णालये, ३ उपजिल्हारुग्णालये, १ सामान्यरुग्णालय,५ प्राथमिक आरोग्य पथके, २ आर्युवेदिक दवाखाने, ५९८ आरोग्यउपकेंद्र ( पैकी ५५५ कार्यान्वित ) व २४ तास ७ दिवस प्रा. आ. कें. ५२, इ. मार्फत ग्रामिण व शहरी जनतेस आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. आरोग्यविभागाच्या विविध योजना राज्यातराबविण्यात अग्रेसर असणारा जिल्हाम्हणुनअहिल्यानगर जिल्ह्याने सार्वजनिक आरोग्य विभागात ठसा उमठविला आहे. .
आरोग्य विभागामार्फत खालील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणीकरण्यांत येते.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान.
- राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम.
- राष्ट्रीय माताबाल संगोपन कार्यक्रम.
- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम.
- राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम.
- राष्ट्रीय कुष्टरोग नियंत्रण कार्यक्रम.
- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम.
वरील कार्यक्रमा व्यतीरिक्त खालील आरोग्य कार्यक्रमाचीही कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली जाते.
- महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्पाअंतर्गतसाथरोग सर्वेक्षण कार्यक्रम पाणी शुदधीकरण व साथ नियंत्रण कार्यक्रम.
- महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्पा अंतर्गत मृत्यूचे कारण सर्वेक्षण (ग्रामिण) योजना व नागरी नोंदणी पदधतीचीअंमलबजावणी.
- जंत विरोधी मोहिम व जिवनसत्व अ वाटप.
- आरोग्य शिक्षण व माहिती प्रसारण कार्यक्रम.
- नवसंजीवनी योजना आदीवासी भागासाठी.
- पल्स पोलिओलसिकरण मोहीम.
- आरोग्य विभागातील कर्मचा-यांचे प्रशिक्षण.
- मातृत्व अनुदान योजना.