अर्थ
रचना व कार्यपध्दती
अर्थ विभागांतर्गत मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे नियंत्रणाखाली कामकाज चालते. तसेच ते जिल्हा परिषदेचे आर्थिक बाबींचे सल्लागार असतात. या विभागामार्फतपुढीलप्रमाणे कामकाज चालते.
१. जिल्हा परिषदेच्या लेख्यांचे संकलन करणे.
२. प्रारंभिक लेखे व देयकाची तपासणी करणे, अर्थ संकल्पीय अंदाज व बिलांची तपासणी व प्रदान करणे, तसेच जि.प.च्या विविध विभागाकडून मंजुरीसाठी येणारी देयके मंजुरकरुन प्रदान करणे.
३. जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व ४ कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवणे, तसेच भविष्य निर्वाह निधी गट विमा रकमा प्रदान करणे.
४. जिल्हा परिषदेचे अधिनस्त असलेले वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करणे.
५. जिल्हा परिषदेचे अधिनस्त असलेले वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांचेसेवानिवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे तसेच तदअनुषंगीक सर्व अभिलेख नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
६. अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक तयार करणे, आर्थिक जमाखर्चाच्या लेख्याचेविवरणपत्र तयार करणे.
७. जिल्हा परिषदेच्या आर्थिक बाबीवर सल्ला देणे व आर्थिक दायीत्वावर लक्ष ठेवणे.
८. आक्षेपार्ह व आर्थिक व्यवहारासंबंधी दक्ष राहणे आणि आक्षेपार्ह व नियमबाहय बाबी मु.का.अ. / मुख्य लेखा परिक्षकांच्या नजरेस आणून देणे.
९. मासिक व वार्षिक हिशेबांचे संकलन करणे.
१०. सर्व पंचायत समिती कार्यालयांचे वर्षातून दोनदा अंतर्गत लेखा परिक्षण करून घेणे व त्याचबरोबर स्थानिक निधी लेखा परिक्षण व महालेखापालयांचेकडीलप्रलंबित परिच्छेद पुर्तताकरणेकामी पाठपुरावा करणे व नियंत्रण ठेवणे.
११. जिल्हा परिषद कार्यालयाचे भांडार / कर्मचाऱ्यांची वेतन निश्चितीपडताळणीचे काम केले जाते.
१२. निविदांची तपासणी करणे व आर्थिक अधिकारांच्या उल्लंघनावार नियंत्रण ठेवणे.
१३. व्याज ठेवी व अन्य गुंतवणूकीच्या हिशेबाची तपासणी करणे.