बंद करा

    उद्दिष्टे आणि कार्ये

    प्रकाशित दिनांक : एप्रिल 8, 2025

    उद्दिष्टे

    अहिल्यानगर ग्रामीण क्षेत्रामध्ये मुलभुत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर, व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवविणे, विविध बचत गट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपक्रम चालविणे, विविध घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास या कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरण याद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

    कार्ये

    1. एकात्मिक व शाश्वत ग्रामीण विकास धोरण 2023-28 ची अंमलबजावणी करणे.
    2. ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध पायाभुत सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणे.
    3. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामधील मुलभुत सेवा सर्वांना सहजरित्या उपलब्ध करून देणे.
    4. जिल्ह्यांतर्गत महिला, शेतकरी, पशुपालक, वृद्ध कलावंत इत्यादी घटकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन, अनुदाने आणि कामकाजावर देखरेख ठेवणे.
    5. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
    6. पंचायत राज व्यवस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
    7. ग्रामविकास विभागाद्वारे घेण्यात आलेल्या पुढाकारांची विविध माध्यमांद्वारे सक्रियपणे माहिती प्रदान करणे.
    8. वेळोवेळी निश्चित गेलेल्या ग्रामविकास विभागाकडील प्रमुख (फ्लॅगशिप) कार्यक्रमांची तत्परतेने अंमलबजावणी करणे.
    9. ग्राम विकास विभागातील महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी परिषदा, कार्यशाळा, ऑनलाईन परिसंवाद आणि प्रदर्शनांना प्रोत्साहन देणे.