महिला व बालकल्याण
केंद्र पुरस्कृतएकात्मिकबाल विकास सेवा योजना कार्यक्रम दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी धारणी (अमरावती) व धारावी (मुंबई) या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बाल मृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिनेसुरु करण्यात आला. एकात्मिकबाल विकास सेवा योजना प्रकल्प एकुण २१ आहेत, त्यापैकी २ आदिवासी व १९ ग्रामीण प्रकल्प आहेत, ५३७५ अंगणवाडी केंद्र कार्यान्वित आहेत..
एकात्मिकबाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीतीललाभार्थ्यांना खालील सेवा पुरविण्यात येत आहेत.
- पूरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- संदर्भ सेवा
- अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण
- आरोग्य व आहार शिक्षण
एकात्मिकबाल विकास सेवा योजनेचा उद्देश –
- ० ते ६ वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
- मुलांचा योग्य शारिरीक, मानसिक, व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
- बालमृत्यू, कुपोषण व शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे.
- बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागांमध्ये धोरण व अंमलबजावणी या बाबत परिणामकारक समन्वय साधणे.
- योग्य पोषण व आरोग्य विषयकशिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्या बाबत मातांची क्षमता वाढविणे.