Close

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ( जि.ग्रा.वि.यं.)

    DRDA Building

     

    प्रस्तावना

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगर कार्यालय मार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  सदर कार्यालय हे स्वायत्त संस्था असून दिनांक 2 फेब्रुवारी 1982 साली याची स्थापना झाली.

    जिल्ह्यात दारिद्र रेषेखाली असणारे कुटुंबकरिता मुलभूत सुविधा पुरवण्याचे कार्य या कार्यालयामार्फत  करण्यात येते. ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याकरिता त्यांना पक्की घरे,  निवारा व आर्थिक आणि व्यावसायिक योजना राबवणे व त्यांचा कृतीसंगम करुन विकास करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहिल्यानगर हे कार्यालय कटिबद्ध आहे

     

    विभागाची महत्त्वाची कार्ये:

    • केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
    • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
    • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
    • लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योग धंदे काढण्याच्या दृष्टीने आदर्श योजना तयार करणे.
    • दिशा (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची) सभा घेणे. – https://disha.gov.in/

     

     

    या कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना

    1. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना
    2. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

     

    1. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना

    जिल्ह्यात राबविण्यात येणारे सर्व योजना

    • प्रधानमंत्री आवास योजना
    • रमाई आवास योजना
    • शबरी आवास योजना
    • पारधी आवास योजना
    • आदिम आवास योजना
    • अटल आवास योजना
    • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
    • मोदी आवास योजना
    • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना
    • पंडित दीनदयाळ जागा खरीदी योजना
    • अतिक्रमण नियामानुकुल

    जिल्ह्याची केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेची माहिती –  PDF

    अधिक महिती करीता – http://www.mahaawaas.org/

     

    1. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

    माहिती

    ग्रामीण भागातील दारिद्रयाचे समुळ उच्चटन करण्यासाठी, केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामिण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे. दारिद्रयाचे निर्मुलन करण्यासाठी ग्रामिण गरिबांना एकत्र आणुन, त्यांचे सक्षम संस्था उभारणे, संस्थामार्फत गरिबांना वित्तिय सेवा पुरवणे, त्यांची क्षमता वृध्दी करणे आणि उपजीविकेचे साधने उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहे.

    केंद्र शासनाने सन 2011-12 पासुन स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे, राष्ट्रिय ग्रामिण जीवनोन्नती अभियानात रुपांतर केले आहे. सन 2013-14 पासुन हे अभियान राज्यात, इन्टेसिव, सेमी इन्टेसिव आणि नॉन इन्टेसिव या तीन कार्यपध्दतिनी राबविण्यात येते.

    दशसुत्री

    स्वसंहाय्यता गटांना दशसुत्री चे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्यांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. दशसुत्री मधिल पहिली पाच सूत्रे स्वसंहाय्यता गटांची आर्थिक क्षमता वृध्दी साठी उपयुक्त आहेत, तर उर्वरित पाच सुत्रे गटाचा सामाजिक विकास करण्यासाठी अंतर्भुत करण्यात आली आहे. प्रत्येक स्वसंहाय्यता गटाने दशसुत्रीचे पालन केल्यास गटातील प्रत्येक सदस्याचा आर्थिक व सामाजिक विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे.

    अधिक महिती करीता – https://www.umed.in/

     

    माहितीचा अधिकार

    प्रथम अपिलीय अधिकारी प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. अहिल्यानगर
    महिती अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जि.ग्रा.वि.यं. अहिल्यानगर
    सहाय्यक महिती अधिकारी कार्यालयीन अधिक्षक, जि.ग्रा.वि.यं. अहिल्यानगर