ग्रामीण पाणी पुरवठा
अहिल्यानगर जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभागा मार्फत ग्रामिण नळ पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी, नवीन विंधनविहीरी घेणे, साध्या विहीरीची बांधकामे, उच्च क्षमतेच्या विंधनविहीरीवर विद्युत पंप बसविणे, प्रादेशिक योजनांची देखभाल व दुरूस्ती, पिण्याचे पाण्याचे टंचाई कालावधीत विविध उपाययोजनाराबविणे, स्थानिक विकास कार्यक्रमातर्गत आमदार निधी व खासदार निधीतील योजनांची अंमलबजावणी, स्वजल धारा योजनेची अंमलबजावणी, शिवकालीन पाणी साठवण योजनेची अंमलबजावणीग्रामिण भागातील शाळांना पाणी पुरवठा करणे, भारत निर्माण योजना या माध्यमातुनग्रामिण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविला जातो. तसेच लोकसहभागातील योजनांसाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांना संपूर्ण सहाय्य, मार्गदर्शन केले जाते व संनियंत्रण केले जाते.
ग्रामिण पाणी पुरवठा विभागाची रचना
जिल्हास्तरावर कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखालीग्रामिण पाणी पुरवठा विभाग कार्यरत आहे. ग्रामिण पाणी पुरवठा विभागातील लेखाशाखा, प्रकल्पशाखा व आस्थापना शाखा मार्फत सनियंत्रण व सुसुत्रिकरणाचे कामकाज चालते. कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखालीजिल्हयातग्रामिण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविणेसाठी १ ग्रा.पा.पु. विभाग, १ यांत्रिकी उपविभाग व ७ ग्रा.पा.पु.उपविभागअस्तीत्वात आहेत. ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे उपविभाग अपुरे असल्याने जिल्हयातीललघुपाटबंधारेउपविभागामार्फतग्रामिण पाणी पुरवठा कार्यक्रम राबविला जातो.